गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम मार्गी लावण्यात येईल !महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़

Date:

Share post:

पी वी आनंदपद्मनाभन
Mumbai

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली. यासाठी सुमारे रु. 22 कोटींची तरतुद करण्यात आली असून, १५ एजन्सींची नेमणूक या कामासाठी करण्यात आली आहे. कालावधी कमी असल्यामुळे काही ठिकाणी यासाठी पेव्हरब्लॉकचा वापर केला जाणार आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त नागरीकांना शाडूची श्रीगणेश मूर्ती घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि महापालिका परिक्षेत्रातील मूर्तीकारांनी शाडूच्याच मूर्ती बनविणे, यासाठी एनजीओंची मदत घेवून नियोजन करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.


महापालिका क्षेत्रात श्रीगणेशोत्सवातील विविध परवानग्यासाठी दि 23 ऑगस्टपासून प्रभागनिहाय एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे RIGHT TO PEE ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याासाठी BOT तत्वावर शौचालये बनविण्याचा प्रस्ताव असून, महिलांसाठी PRE FABRICATED TOILETS बनविण्याची योजना प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिली. तसेच महापालिका शाळा, उद्याने व रुग्णालये याठिकाणी सीसीटीव्ही लावणेबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Related articles

🎯🌟 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई — विशेष प्रेरणादायक संदेश 🌟🎯🗓️ तारीख:13.11.2025 आज का विचार — जीवन दर्शन विशेषांक✍️ प्रस्तुतकर्ता: Editor-in-Chief – राजेश लक्ष्मण...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक जन कल्याण टाइम 🌿✨ "ज़िन्दगी का असली अर्थ" ✨🌿 ✍️ राजेश लक्ष्मण गावड़े जी की कलम...

पत्नी की पॉपुलैरिटी का पड़ा असर, शोबिज में इग्नोर हुए फराह खान के पति, बोलीं- दुनिया

फराह खान ने सानिया मिर्जा के शो में बॉलीवुड और अपनी पर्सनल लाइफ से जुड़ी कई बातें शेयर...

🛑 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई — विशेष रिपोर्ट 🛑🗓️ तारीख: 13 नवम्बर 2025🎬 मनोरंजन जगत से बड़ी ख़बर

धनंजय राजेश गावड़े ( प्रेस फोटोग्राफर नवसारी गुजरात) 🌧️ “टपरी पे छपरी” की फिर से शुरू हुई तैयारी —...

प्रेरणादायक व आध्यात्मिक संदेश, जो आज गुरुवार के पवित्र अवसर पर साईं बाबा की कृपा के भाव को दर्शाता है —🕉️ 🌸 आज का...

धनंजय राजेश गावड़े ( प्रेस फोटोग्राफर नवसारी गुजरात) 🙏 "साईं बाबा की कृपा – जीवन में विश्वास की शक्ति"...