Close Menu
    What's Hot

    काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    June 7, 2026

    एक फ्लैट, बंद दरवाजा और दोस्त बनकर आया था कातिल… दिल्ली में महिला प्रोफेसर के मर्डर में क्या खुलासे हुए?

    June 7, 2026

    📰 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई प्रस्तुति: एडिटर इन चीफ राजेश लक्ष्मण गावड़े✨ दिल्ली फ्लाइट से पहले अभिनेता विपिन भारद्वाज की विशेष मुलाकात, मुंबई में राजेश लक्ष्मण गावड़े, लेखक-निर्देशक राजेश भट्ट और RLG Production के स्पेशल DOP परेश पटेल भी रहे मौजूद मुंबई | जन कल्याण टाइम न्यूज़

    June 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Home»Political»काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
    Political

    काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    जनकल्याण टाइमBy जनकल्याण टाइमJune 7, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram Copy Link
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

    पी.वी.आनंदपद्मनाभन
    मुंबई,
    राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे काँग्रेसचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचा दावा यावेळी शिंदे यांनी केला.
    प्रवेश सोहळ्यात साहेबराव कांबळे यांच्यासह सूर्यकांता दिंडाळकर, राहुल वानखेडे, प्रफुल्ल खंदारे, विद्यानंद नलावडे, कैलास घोगरे, नामदेवराव शिंगणकर, पंजाबराव भालेराव, रवींद्र जाधव, संतोष चव्हाण यांच्यासह युवक काँग्रेस, महिला आघाडी, खरेदी-विक्री संघ आणि विविध संघटनांमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याच प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी यावेळी प्रवेश केला. त्यामध्ये उपनगराध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

    या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड-महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत तब्बल ९३ हजार मते मिळविणारे साहेबराव कांबळे हे प्रभावी नेतृत्व असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    मंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबराव कांबळे यांनी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले. आता ते शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी अधिक जोमाने काम करतील, असेही शिंदे यांनी सांगितले.

    “संजय राठोड हे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासह आता दुष्यंत चतुर्वेदी हेदेखील पक्षाकडून बिनविरोध निवडून आले आहेत. साहेबराव कांबळे यांच्यासारखे तडफदार कार्यकर्ते पक्षात आल्याने त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम आम्ही करू,” असे सांगत शिंदे यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

    पीक विमा, वीटभट्टी कामगार भगिनींना शासकीय योजनांचा लाभ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी तसेच विविध विकासकामांना गती देण्यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

    स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री, आमदार आणि शासन यंत्रणा समन्वयाने काम करेल, असेही ते म्हणाले.
    साहेबराव कांबळे यांनी काँग्रेसची विधान परिषदेची उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना शिंदे म्हणाले की, विकासासाठी एकत्र आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला शिवसेना ताकद देईल. शब्दाला जागणारा कार्यकर्ता अशी साहेबराव कांबळे यांची ओळख असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून मेहनती कार्यकर्त्यांना पक्षात योग्य मान-सन्मान आणि संधी मिळेल, अशी ग्वाही देताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा घराघरात पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे.
    राज्यभरातून शिवसेनेत होत असलेल्या प्रवेशांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत. हे पक्षावरील आणि महायुती सरकारच्या विकासकामांवरील वाढत्या विश्वासाचे द्योतक आहे.

    विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, विकासाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. संबंधित भागाचा विकास व्हावा, तेथील जनतेची कामे मार्गी लागावीत या भावनेतून साहेबराव कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
    महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी सांगितले की, विरोधकांकडे आता कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत. महायुतीमध्ये एकवाक्यता असून सर्व १७ उमेदवार दमदारपणे निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झपाट्याने होत असून विरोधकांकडे मुद्दे नसल्याने केवळ आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
    लाईव्ह कार्यक्रमादरम्यान झालेल्या मृत्यूच्या घटनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, पोलीस सखोल चौकशी करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
    मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला कार्यक्रम हा संपूर्ण सरकारचाच कार्यक्रम होता. विरोधकांकडे कोणतेही प्रश्न नसल्याने ते प्रत्येक विषयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

    Follow on Google News Follow on Flipboard
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleएक फ्लैट, बंद दरवाजा और दोस्त बनकर आया था कातिल… दिल्ली में महिला प्रोफेसर के मर्डर में क्या खुलासे हुए?
    जनकल्याण टाइम

    Related Posts

    सौरभ दास , विजेता दहिया और आशुतोष रांका… कॉकरोच जनता पार्टी के तीन प्रवक्ता कौन हैं?

    June 4, 2026

    अन्नामलाई के पार्टी छोड़ने पर पॉज… अमित शाह-नितिन नवीन और बीएल संतोष के साथ मीटिंग में क्या हुआ?

    June 3, 2026

    राज्यसभा की 24 सीटों पर चुनाव का ऐलान, बीरेन सिंह, रवनीत बिट्टू और नरोत्तम मिश्रा समेत कई नामों की चर्चा

    June 1, 2026

    पंजाब: 8 नगर निगमों में से 5 पर जीती AAP, CM भगवंत मान ने बताया 2027 विधानसभा चुनाव का ट्रेलर

    May 31, 2026

    जालंधर के RTI एक्टिविस्ट की फगवाड़ा में गोली मारकर हत्या, कार में आए अज्ञात हमलावरों ने की फायरिंग

    May 30, 2026

    सोहारी पंचायत चुनाव: मारपीट और हिंसक झड़प मामले ने पकड़ा राजनीतिक तूल

    May 28, 2026
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Economy News

    काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    By जनकल्याण टाइमJune 7, 2026

    पी.वी.आनंदपद्मनाभनमुंबई,राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला…

    एक फ्लैट, बंद दरवाजा और दोस्त बनकर आया था कातिल… दिल्ली में महिला प्रोफेसर के मर्डर में क्या खुलासे हुए?

    June 7, 2026

    📰 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई प्रस्तुति: एडिटर इन चीफ राजेश लक्ष्मण गावड़े✨ दिल्ली फ्लाइट से पहले अभिनेता विपिन भारद्वाज की विशेष मुलाकात, मुंबई में राजेश लक्ष्मण गावड़े, लेखक-निर्देशक राजेश भट्ट और RLG Production के स्पेशल DOP परेश पटेल भी रहे मौजूद मुंबई | जन कल्याण टाइम न्यूज़

    June 7, 2026
    Top Trending

    काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    By जनकल्याण टाइमJune 7, 2026

    पी.वी.आनंदपद्मनाभनमुंबई,राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून…

    एक फ्लैट, बंद दरवाजा और दोस्त बनकर आया था कातिल… दिल्ली में महिला प्रोफेसर के मर्डर में क्या खुलासे हुए?

    By जनकल्याण टाइमJune 7, 2026

    दिल्ली के वसुंधरा एन्क्लेव में मौजूद सत्यं अपार्टमेंट में असिस्टेंट प्रोफेसर देवोस्मिता…

    📰 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई प्रस्तुति: एडिटर इन चीफ राजेश लक्ष्मण गावड़े✨ दिल्ली फ्लाइट से पहले अभिनेता विपिन भारद्वाज की विशेष मुलाकात, मुंबई में राजेश लक्ष्मण गावड़े, लेखक-निर्देशक राजेश भट्ट और RLG Production के स्पेशल DOP परेश पटेल भी रहे मौजूद मुंबई | जन कल्याण टाइम न्यूज़

    By जनकल्याण टाइमJune 7, 2026

    हिंदी फिल्म इंडस्ट्री के उभरते हुए अभिनेता विपिन भारद्वाज इन दिनों अपनी…

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Advertisement
    Demo
    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.