उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन
मुंबई,

सत्तेच्या खुर्चीसाठी २०१९ मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केले, हिंदुत्वाला डॅमेज केले, शिवसेनेला डॅमेज केले, आता आभाळ फाटलंय त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. उबाठाच्या डॅमेज कंट्रोलबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खिल्ली उडवली. मुंबईत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीसारखा खुर्चीचा अजेंडा नाही तर महायुतीचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे, राज्याला पुढे नेणे आहे. राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन व़ॉर रुम झालेली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष व़ॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२३ नुसार उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे. महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल. यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते याची आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी करुन दिली. महाकुंभसाठी शिवसेनेचे नेते प्रयागराजला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. तुम लढो हम कपडा संभालता है या विचारांचा नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतोय पण ज्यांना सोडून लोक जात आहेत त्यांनी त्यावर आत्मपरिक्षण करायला हवे, असा सल्ला शिंदे यांनी दिला. बंद पडलेल्या किंवा दिवाळखोरीत गेलेल्या कारखान्यांच्या कामगारांना लवकरात लवकर थकीत देणी मिळावीत, यासाठी राज्याच्या ‘एमआयडीसी’कडून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==

Related articles

विरासत की सियासत… बिहार में नेताओं के बेटे-बेटियों वाली सीट पर किसका दबदबा?

बिहार विधानसभा चुनाव 2025 में विरासत की राजनीति चरम पर दिखी, जहां लगभग हर जिले में बड़े राजनीतिक...

ये वेब सीरीज चौंकाएगी, दिमाग घुमाएगी और इमोशनल भी करेगी, 2025 के बेहतरीन क्राइम शोज में से एक

शेफाली शाह और रसिका दुग्गल की वेब सीरीज दिल्ली क्राइम सीजन 3 आज नेटफ्लिक्स पर रिलीज हो गई...

🎙️ प्रेरणादायक संदेश — “मन की खेती”📰 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई के माध्यम से✍️ Editor-in-Chief: श्री राजेश लक्ष्मण गावड़े जी की कलम से

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक जन कल्याण टाइम प्रिय दर्शको,कभी आपने सोचा है कि हम जो सोचते हैं, जो...

इंडस्ट्री में मेल एक्टर्स भी नहीं सेफ! जब कास्टिंग काउच का श‍िकार हुए ये सेलेब्स

ऋत्विक धनजानी, अंकित गुप्ता, रणवीर सिंह, आयुष्मान खुराना जैसे कई कलाकारों ने कास्टिंग काउच के डरावने अनुभव शेयर...