उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा*

Date:

Share post:

नवीन वर्ष सर्वांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणारं;

*राज्याला सर्वांगीण विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल*

*पी.वी.आनंदपद्मनाभन

मुंबई, दि. 31 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2025 नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे.

कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर सुरू असलेली वाटचाल कायम ठेवून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी गतिमान करूया, असं सांगतानाच नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Related articles

प्रेस की आजादी पर भयानक हमला’, पंजाब के शीश महल विवाद को लेकर AAP पर भड़के कांग्रेस नेता प्रताप सिंह बाजवा

आप नेता अरविंद केजरीवाल को लेकर आरोप लगे हैं कि उन्हें दिल्ली की तरह पंजाब में भी भगवंत...

नवी मुंबई के मौसम का आज कैसा रहेगा मिजाज, क्या

इंडिया वुमेंस वर्सेस साउथ अफ्रीका वुमेंस आईसीसी वुमेंस क्रिकेट वर्ल्ड कप 2025 का फाइनल आज नवी मुंबई में...

न बाइक, कार और ट्रक…गुजरात में नदी पर बने इस पुल ने कर डाली 27 करोड़ की कमाई, सोशल मीडिया पर जमकर चर्चा

कॉमनवेल्थ से लेकर 2036 ओलंपिक खेलों के लिए दावेदारी पेश कर रहे अहमदाबाद की इन दिनों सोशल मीडिया...

विधानसभा सत्र खत्म, अब नगरोटा उपचुनाव में तेज होगा चुनाव प्रचार

जम्मू। जम्मू-कश्मीर विधानसभा का सत्र खत्म होते ही नगरोटा विधानसभा उपचुनाव का माहौल और गरमाने लगा है। राजनीतिक...