जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्प गतीने पूर्ण करावेत-मुख्य सचिव तथा पालक सचिव सुजाता सौनिक

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन

  आपल्या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काम  झाले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात. आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा, आणि जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव सुजाता सौनिक यांनी आज येथे दिले.
  जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज राज्याच्या मुख्य सचिव तथा ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
 यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मनिषा आवळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी झो.पु.प्रा. ठाणे पराग सोमण, सिडको 1 चे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, आदिवासी विकास ठाणे अपर आयुक्त दीपक कुमार मीना, सिडको 2 चे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले, कल्याण स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त संजय यनपुरे, मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांड्ये, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, डीसीएफ शहापूर दीपेश मल्होत्रा, कांदळवन डीसीएफ शैलेशकुमार जाधव, वनसंरक्षक अनिता पाटील, ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळे प्रवर्ग डाकघर अधिकारी समीर महाजन,अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे हे उपस्थित होते.
 या बैठकीत मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव सुजाता सौनिक यांनी क्षेत्रीय कार्यालयासाठी आगामी 100 दिवसांमध्ये 7 कलमी कृती आराखड्याप्रमाणे प्रभावी कार्यवाही करणे, राज्य सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, माहितीचा अधिकारी 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, CPGRAM प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे आदी विषयांचा आढावा घेतला.
 मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव श्रीमती सौनिक पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या कृती आराखड्याची गुड गव्हर्नन्ससाठी प्राधान्याने अंमलबजावणी करावी. ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प हे वेळेत व अधिक गतीने पूर्ण होतील, असे पाहावे. काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्येक प्रकल्पाच्या संबंधित यंत्रणांनी याकडे जातीने लक्ष देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत.
 बैठकीच्या सुरुवातीला कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मुख्य सचिव तथा पालक सचिव सुजाता सौनिक यांचे स्वागत केले. 
  तसेच .शिनगारे यांनी क्षेत्रीय कार्यालयासाठी आगामी 100 दिवसांमध्ये 7 कलमी कृती आराखड्याप्रमाणे प्रभावी कार्यवाही करणे, राज्य सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, माहितीचा अधिकारी 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, CPGRAM प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे आदी विषयांची संगणकीय सादरीकरणाद्वारे मुख्य सचिव तथा पालक सचिव महोदयांना माहिती दिली.

https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==

Related articles

आईआरसीटीसी की श्रावण स्पेशल यात्रा 5 अगस्त से अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा के लिए मडगांव से रवाना होगी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन

मुंबई। भारतीय रेलवे खानपान और पर्यटन निगम लिमिटेड (आईआरसीटीसी) इस श्रावण मास में विशेष धार्मिक यात्रा का आयोजन...

🌟🎤 “समय की हार भी तय है!”(Motivational Speech by Rajesh Laxman Gavade – RLG Production)

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 🕰️💬"कब तक जीत है समय की, ए मेरे दोस्त?इक दिन...

स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात प्रथमराज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

पी.वी.आनंदपद्मनाभननवी दिल्ली,स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले...

दिल्ली वाले देते हैं सबसे ज्यादा गालियां

पंजाब में 78 फीसदी लोग बकते हैं गालियां 11 सालों से भारत को गाली मुक्त बनाने के लिए अभियान...