मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्य

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन

मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सायं. 7.30 पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी 101 लोकांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी 7.30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केले आहे. यात 3 नौदलाचे जवान असून 10 नागरिक आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलिस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यात नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉफ्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. त्यामुळे सविस्तर माहिती उद्यापर्यंत प्राप्त होईल. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल.

Related articles

निर्देशक अर्जुन राज की फिल्म “खेल पासपोर्ट का” का ट्रेल रिलीज़ मुंबई में।

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) मुंबई, 19अप्रैल। बॉलीवुड के जाने माने फिल्म निर्देशक अर्जुन राज...

मुंबईकरों को अब पहले से मिलेगी पेड़ों की छंटाई की जानकारी

21 अप्रैल 2025 से वार्ड ऑफिस के सूचना फलक और सोशल मीडिया पर जारी होगा शेड्यूल बरसात से पहले...

गुड फ्राइडे (Good Friday) ईसाई धर्म में एक महत्वपूर्ण पवित्र दिन है, जो प्रभु यीशु मसीह (Jesus Christ) के क्रूस पर बलिदान और मृत्यु...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) यह दिन ईस्टर संडे से पहले आने वाला शुक्रवार है...