नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील..!* *- मंत्री,भरतशेठ गोगावले यांची घोषणा*

Date:

Share post:

*P .V.Anandpadmanabhan*

नागपूर

सन. २०२५ मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या ” लालपरी ” बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली

सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड कमतरता आहे. एसटीच्या ताफ्यामध्ये आता १४ हजार बसेस असून करोना महामारीपूर्वी म्हणजे सन . २०१८ मध्ये एसटी कडे तब्बल १८ हजार बसेस होत्या. परंतु गेल्या ३-४ वर्षात करोना महामारी व इतर काही कारणामुळे एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे .तसेच बसेसची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त बस फेऱ्या देणे शक्य होईना. या सगळ्याचा विचार करून एसटीने स्वमालकीच्या २२०० बसेस खरेदी करण्याचा व १३०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सुमारे साडेतीन हजार बसेस जानेवारी महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात समाविष्ट व्हायला सुरू होईल. त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस नादुरुस्त होणे, बसेसची दोन ,दोन तास वाट पाहत बसणे अशा तक्रारीला कमी होतील.असे प्रतिपादन श्री. गोगावले यांनी यावेळी केली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यातील सर्व बस स्थानकाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना महामंडळाने आखली असून, काही बस स्थानके ही शासनाच्या निधीतून तर काही बस स्थानके बांधा-वापरा -हस्तांतरीत करा या तत्त्वावर खाजगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहेत. मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकाऱ्यांने राज्यभरातील १८३ बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली होती. त्याला आता गती प्राप्त झाली असून, नागपूर मधील गणेश पेठ बस स्थानकाचे काँक्रिटीकरण देखील याच टप्प्यात पूर्ण होत आहे. भविष्यात विदर्भातील एक देखणं बस स्थानक म्हणून गणेश पेठ बस स्थानकाचा नावलौकिक होईल असा गौरव श्री गोगवले यांनी यावेळी केला. – यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित

Related articles

🎯🌟 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई — विशेष प्रेरणादायक संदेश 🌟🎯🗓️ तारीख:13.11.2025 आज का विचार — जीवन दर्शन विशेषांक✍️ प्रस्तुतकर्ता: Editor-in-Chief – राजेश लक्ष्मण...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक जन कल्याण टाइम 🌿✨ "ज़िन्दगी का असली अर्थ" ✨🌿 ✍️ राजेश लक्ष्मण गावड़े जी की कलम...

पत्नी की पॉपुलैरिटी का पड़ा असर, शोबिज में इग्नोर हुए फराह खान के पति, बोलीं- दुनिया

फराह खान ने सानिया मिर्जा के शो में बॉलीवुड और अपनी पर्सनल लाइफ से जुड़ी कई बातें शेयर...

🛑 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई — विशेष रिपोर्ट 🛑🗓️ तारीख: 13 नवम्बर 2025🎬 मनोरंजन जगत से बड़ी ख़बर

धनंजय राजेश गावड़े ( प्रेस फोटोग्राफर नवसारी गुजरात) 🌧️ “टपरी पे छपरी” की फिर से शुरू हुई तैयारी —...

प्रेरणादायक व आध्यात्मिक संदेश, जो आज गुरुवार के पवित्र अवसर पर साईं बाबा की कृपा के भाव को दर्शाता है —🕉️ 🌸 आज का...

धनंजय राजेश गावड़े ( प्रेस फोटोग्राफर नवसारी गुजरात) 🙏 "साईं बाबा की कृपा – जीवन में विश्वास की शक्ति"...