प्रसारभारती, उद्योग विभाग आणि महाराष्ट्र, चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार.माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात प्रकल्प उभारणी होणार

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन

*मुंबई,
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व प्रसारभारती, ब्रॉडकास्टिंग ऑफ इंडिया, आकाशवाणी, मालाड (पश्चिम) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

ब्रॉडकास्टिंग ऑफ इंडिया, आकाशवाणी, मालाड (पश्चिम) यांच्या अखत्यारित असणाऱ्या १५० एकर जागेवर आगामी काळात प्रसारभारती, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि उद्योग विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने चित्रपट, मनोरंजन, माध्यम या क्षेत्रातील जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राला जागतिक पातळीवरील प्रोडक्शन हबमध्ये स्थाने मिळविणे सुलभ होणार असून एकाच छताखाली माध्यम, प्रसारण, शिक्षण धोरणांची अंमलबजावणी करता येणार आहे.

Related articles

कुलगांव-बदलापूर नगरपरिषद को इंडियन बैंक से CSR निधि के तहत 2 पीओएस मशीन प्राप्त

बदलापूर। कुलगांव-बदलापूर नगरपरिषद को इंडियन बैंक, बदलापूर शाखा की ओर से कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधि के अंतर्गत...

🌟🙏 साईं राम! एक चेतावनी नहीं – ये जीवन का मंत्र है! 🙏🌟(प्रेरणास्पद संदेश – Rajesh Bhatt Saab, Mumbai की ओर से)प्रस्तुति – Jan...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 🎤 "तू करता वो है जो तू चाहता है…पर होता...

🎬🌟 7 Heaven Entertainment प्रस्तुत करता है:

B Ashish ( jan Kalyan time News mumbai) Bollywood press photographer "Aaj Ke Sholay" 🎞️ एक फिल्म जो इतिहास फिर से...