
ला.प्र. वि. घटक ठाणे तक्रारदार महिला, वय-46 वर्षे
आरोपी भरत संजय पाटोळे वय-35 वर्षे, पदनाम-लिपिक टंकलेखक, अतिरिक्त आयुक्त -2 यांचे कार्यालय, कल्याण – डोंबिवली महानगरपालिका, कल्याण , जि. ठाणे (वर्ग 3)
यातील तक्रारदार हे साई इंग्लिश स्कूल, कल्याण पूर्व येथे लिपिक म्हणून नोकरीस आहेत.त्यांचे स्कूल चे बिल्डिंग करिता सण 2022 व 2025 मध्ये यातील आलोसे यांनी प्रत्येकी रु. 30000/- घेऊन अग्निशमन विभागाचे ना -हरकत प्रमाणपत्र ( Fire NOC) दिले होते त्याप्रमाणे यावर्षी ची Fire NOC देण्याकरिता रु. 30000/- किंवा त्यापेक्षा जास्त पैसे लागतील असे बोलून लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रारदार यांनी ला.प्र.वि., ठाणे यांच्याकडे तक्रार दिलेली होती.
दि.27/04/2026 रोजी
केलेल्या कायदेशीर पडताळणी दरम्यान लोकसेवक भरत पाटोळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ते लिपिक म्हणून नोकरीस असलेल्या साई इंग्लिश स्कूल च्या इमारतीचा अग्निशमन विभागाचा ना – हरकत प्रमाणपत्र देणेकामी तडजोडीअंती रु. 40000/- एवढी लाच रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
दि.30/04/2026 रोजी लोकसेवक भरत संजय पाटोळे यांना तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष रु. 40000/- रक्कमेची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे.
आरोपीची अंगझडती/ वाहन झडती/ कार्यालयाची झडती*
आरोपीची यांची अंगझडती घेणेत आलेली आहे
गुन्ह्याचे तपासकामी आरोपीची यांचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपीची घरझडती
पोनि शर्मिला पाटील, लाप्रवी, ठाणे ह्या करीत आहेत .
पो.स्टे. कोळसेवाडी, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय येथे
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम-२०१८) कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गुन्हा नोंद कोळसेवाडी पोलीस स्टेशन, कल्याण पूर्व येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीची यांना ताब्यात घेतलेले आहे.


