Close Menu
    What's Hot

    🔱 महाशिवरात्रि 2026 SPECIAL 🔱💥 भक्ति का दिव्य स्वर, जो सीधे दिल से महादेव तक पहुँचे 💥🎶 अजय बाली का शिवभजन🕉️ “जय शिव शंकर जय भोलेनाथ”🚩 भव्य रूप से हुआ RELEASE 🚩━━━━━━━━━━━━━━━━━━━━

    February 15, 2026

    🙏 जय श्री साईंनाथ 🙏🙏 हर हर महादेव 🙏✨ श्रद्धा, शक्ति और शरण की अमर गाथा ✨(दिव्य चित्र से प्रेरित विस्तृत आध्यात्मिक कथा)

    February 15, 2026

    बॉलीवुड के ‘खूंखार’ विलेन जिन्होंने अपना प्यार पाने के लिए की हदें पार, बने आशिक

    February 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Home»mumbai»जिल्हा परिषद ठाणे आयोजित कर्मचाऱ्यांच्या सुदृढ मानसिक आरोग्यासाठी MYCA ॲप उद्घाटन सोहळा संपन्न*
    mumbai

    जिल्हा परिषद ठाणे आयोजित कर्मचाऱ्यांच्या सुदृढ मानसिक आरोग्यासाठी MYCA ॲप उद्घाटन सोहळा संपन्न*

    जनकल्याण टाइमBy जनकल्याण टाइमJanuary 24, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram Copy Link
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

    *पी.वी.आनंदपद्मनाभन*

    *–*  जिल्हा परिषद, ठाणे आयोजित मानसिक आरोग्य विषयक जनजागृतीच्या उद्देशाने परिवर्तन व वोपा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘मायका’हे मराठीमध्ये पहिले ॲप तयार करण्यात आले आहे. मानसिक आरोग्य या कोर्स चा लोकार्पण सोहळा आज, दि. २३ जानेवारी, २०२५ रोजी बैरामजी जीजीभाय हायस्कूलच्या सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, तर प्रमुख अतिथि म्हणून रेडिओ जॉकी (RJ) संग्राम खोपडे, परिवर्तन संस्थेचे डॉ. हमीद दाभोळकर, वोपा संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत, संचालिका ऋतुजा जेवे हेही उपस्थित होते.

              मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने कर्मचाऱ्यांच्या सुदृढ मानसिक आरोग्यासाठी MYCA ॲप तयार करण्यात आले असून या ॲपच्या निर्मितीसाठी नोसील लि. (NOCIL Ltd) आणि मोरडे फूडस यांचे अर्थसहाय्य लाभले आहे. कर्मचारी यांच्या सुदृढ आरोग्यासाठी अॅपची मदत होणार असून सर्वांनी अॅप डॉउनलोड करावे व आवश्यक असल्यास डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी उपस्थित सर्वांना केले.
             रोडिओ जॉकी (आर.जे) संग्राम खोपडे यांनी मानसिक ताण तणावाच्या उत्क्रांती संदर्भांतील माहिती दिली. आजच्या डिजिटल जगातील वाढलेल्या तणावावर बोलताना त्यांनी माणसाच्या एखाद्या समस्येला सामोरे जाण्यासाठी लढा किंवा पळा या प्रतिसादावर भाष्य केले. ज्याप्रमाणे आपण शारिरीक व्याधींवर बोलतो, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर देखील बोलणे महत्त्वाचे आहे. लोकांमध्ये माहिती प्रसारित करण्यात समाज माध्यमांची व सेलेब्रिटींची भूमिका देखील महत्त्वाची आहे. आयुष्यात भावना का महत्वाच्या असतात, भावनांना योग्य पद्धतीने व्यक्त करणे का महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण स्वतःसाठी व कुटुंबासाठी देखील पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले.

              डॉ. हमीद दाभोळकरांनी ‘मायका’ अॅपच्या निर्मिती मागील पाश्वभूमी सांगताना ‘मानसिक आजार हे योग्य उपचाराने बरे होऊ शकतात’ यावर भर दिला. परिवर्तन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी शासन यंत्रणेचे कौतुक करताना जिल्हा परिषद, ठाणे महाराष्ट्रातील मानसिक आरोग्याबाबत उपक्रम राबविणारी पहिलीच जिल्हा परिषद असल्याचे उद्गार काढले. त्यांनी वयात येणाऱ्या मुलामुलींच्या भावना कशा हाताळाव्या याचे प्रशिक्षण शिक्षकांना, पालकांना उपलब्ध नाही, याकडे लक्ष वेधले. याबद्दल ‘मायका’ अॅप मध्ये ‘भावनिक प्रथमोपचार’ या भागात त्याविषयीची शास्रोक्त माहिती उपलब्ध असल्याची माहिती दिली.

             वोपा संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी शिक्षण क्षेत्रात ३० लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्यानंतर आता मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. “मानसिक आरोग्यासंदर्भात सकारात्मकतेइतकीच स्विकारात्मकता देखील महत्त्वाची असते”, असे प्रतिपादन केले.

              मायकामध्ये मानसिक आरोग्य, आजारांविषयी, शास्त्रीय माहिती, स्वतःला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना भावनिक आधार कसा द्यावा, मानसिक आरोग्याविषयीचे प्रशिक्षण, तज्ञ व्यक्तींशी संपर्क साधण्याची यंत्रणा आदी माहिती मराठी भाषेत उपलब्ध आहे. मायका ॲप द्वारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या ताण-तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, भावनिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी कोणती तंत्रे उपयुक्त ठरतील, काम व वैयक्तिक आयुष्य यात संतुलन कसे राखावे, इत्यादीविषयी सविस्तर माहिती उपलब्ध असून या ॲप मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने चॅटबॉटशी संवाद साधता येणार आहे.

    https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==

    Follow on Google News Follow on Flipboard
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleदावोस में महाराष्ट्र का दबदबा,महाराष्ट्र भविष्य में बनेगा डेटा सेंटर की राजधानी
    Next Article सैफ अली खान पर हमले की रात क्या-क्या हुआ? एक्टर ने पुलिस के सामने दर्ज कराया बयान
    जनकल्याण टाइम

    Related Posts

    JAN KALYAN TIME NEWS, MUMBAI Special Report | Margao (Madgaon), Goa Under the Direction of Editor-in-Chief: Rajesh Laxman Gavade

    February 11, 2026

    मुंबई पुलिस की तत्परता और ईमानदारी को सलाम साइबर फ्रॉड के शिकार नागरिक को पूरी रकम वापस दिलाकर पेश की मिसाल मुंबई | जन कल्याण टाइम न्यूज़

    February 7, 2026

    मुंबई पुलिस की तत्परता और ईमानदारी को सलाम साइबर फ्रॉड के शिकार नागरिक को पूरी रकम वापस दिलाकर पेश की मिसाल मुंबई | जन कल्याण टाइम न्यूज़

    February 7, 2026

    📰 TITLE: ‘ख़ुदा गवाह’ से मशहूर अभिनेता अली ख़ान साहब ने पेश की सच्ची देश भक्ति की मिसाल Jan Kalyan Time News | मुंबई आज के विशेष दिन पर बॉलीवुड अभिनेता अली ख़ान साहब ने अपने कर्मों से देश भक्ति की ऐसी मिसाल पेश की, जिसने फ़िल्मी दुनिया से लेकर आम जनता तक को गर्व से भर दिया।

    January 26, 2026

    📰 NEWS UPDATE — Jan Kalyan Time News, Mumbai देश की बात — श्री Naresh V. Patel जी के साथ Special Conversation by Bollywood Actor & Stand-up Comedian B. Ashish रिपोर्ट : धनंजय राजेश गावडे प्रेस फ़ोटोग्राफ़र — Jan Kalyan Time News

    December 10, 2025

    महाराष्ट्र में बंजारा समुदाय की ST का दर्जा देने की मांग

    September 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Economy News

    🔱 महाशिवरात्रि 2026 SPECIAL 🔱💥 भक्ति का दिव्य स्वर, जो सीधे दिल से महादेव तक पहुँचे 💥🎶 अजय बाली का शिवभजन🕉️ “जय शिव शंकर जय भोलेनाथ”🚩 भव्य रूप से हुआ RELEASE 🚩━━━━━━━━━━━━━━━━━━━━

    By जनकल्याण टाइमFebruary 15, 2026

    🔱 महाशिवरात्रि के पावन अवसर पर भक्ति का दिव्य स्वर 🔱 महाशिवरात्रि जैसे परम पावन…

    🙏 जय श्री साईंनाथ 🙏🙏 हर हर महादेव 🙏✨ श्रद्धा, शक्ति और शरण की अमर गाथा ✨(दिव्य चित्र से प्रेरित विस्तृत आध्यात्मिक कथा)

    February 15, 2026

    बॉलीवुड के ‘खूंखार’ विलेन जिन्होंने अपना प्यार पाने के लिए की हदें पार, बने आशिक

    February 14, 2026
    Top Trending

    🔱 महाशिवरात्रि 2026 SPECIAL 🔱💥 भक्ति का दिव्य स्वर, जो सीधे दिल से महादेव तक पहुँचे 💥🎶 अजय बाली का शिवभजन🕉️ “जय शिव शंकर जय भोलेनाथ”🚩 भव्य रूप से हुआ RELEASE 🚩━━━━━━━━━━━━━━━━━━━━

    By जनकल्याण टाइमFebruary 15, 2026

    🔱 महाशिवरात्रि के पावन अवसर पर भक्ति का दिव्य स्वर 🔱 महाशिवरात्रि…

    🙏 जय श्री साईंनाथ 🙏🙏 हर हर महादेव 🙏✨ श्रद्धा, शक्ति और शरण की अमर गाथा ✨(दिव्य चित्र से प्रेरित विस्तृत आध्यात्मिक कथा)

    By जनकल्याण टाइमFebruary 15, 2026

    इस दिव्य चित्र में जो दृश्य उभरता है,वह केवल रंगों और आकृतियों…

    बॉलीवुड के ‘खूंखार’ विलेन जिन्होंने अपना प्यार पाने के लिए की हदें पार, बने आशिक

    By जनकल्याण टाइमFebruary 14, 2026

    बॉलीवुड का रोमांस दुनियाभर में मशहूर माना जाता है. उनकी फिल्मों में…

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Advertisement
    Demo
    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.