पी.वी.आनंदपद्मनाभन
ठाणे :
आ. संजयकोकण केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकादमी, संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चषक २०२५
या खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा मुंबईसह कोकण विभागासाठी मर्यादीत आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज, ठाणे येथे तर अंतिम फेरी १५ जानेवारी २०२५ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे अशी माहिती आ. संजय केळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
केळकर यांनी पुढे सांगितले की, गेल्या १७ वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे १८ वें वर्षे आहे. पूर्वी ही स्पर्धा ठाणे, पालघर, रायगड पर्यंत सीमित होती आता ती मुंबई सह खुली स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत २५ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या २५ स्पर्धेतून सात एकांकिका या अंतिम फेरीत येईल. अनेक मान्यवर परीक्षक या स्पर्धेसाठी सहभागी असतात. या स्पर्धेतून अनेक बालकलाकार पुढे आले आहे. या कलाकारांना व्यासपीठ आणि संधी या स्पर्धेतून मिळत असते असे केळकर यांनी सांगितले. सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी प्रथम पारितोषिक ३५ हजार रु. व चषक, द्वितीय पारितोषिक २५ हजार व चषक आणि तिसरे पारितोषिक १५ हजार आणि चषक, सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी प्रथम २५०० रु. व चषक, द्वितीय क्रमांकासाठी २००० व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी १००० व चषक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रथम २५०० रु. व चषक, द्वितीय क्रमांकासाठी २००० व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी १००० व चषक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम ३००० रु. व चषक, द्वितीय क्रमांकासाठी २००० व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी १००० व चषक, सर्वोत्कृष्ट लेखक (नविन संहितेसाठी) ३००० रु. व चषक, सर्वोत्कृष्ट नेपथ्य ३००० रु. व चषक, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ३००० रु. व चषक, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना ३००० रु. व चषक असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा विनामूल्य आहे.