मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक*

Date:

Share post:

*कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला निषेध*

पी.वी.आनंदपद्मनाभन*

मुंबई, सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.यावर बोलताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र सरकार तीव्र शब्दात निषेध करीत आहे. मी देखील मराठी भाषिकांच्या लढ्यात तुरुंगवास भोगला असून याप्रश्नी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमच्या सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने वकील दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील यापूर्वी या प्रश्नाबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन देखील कर्नाटक सरकार अशी भूमिका घेत असेल तर कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

Related articles

“सादगी परम सौंदर्य है।शमा – यानी खुद जलकर दूसरों को रौशनी देना – उत्कृष्ट बल है। विनम्रता – यह सबसे अच्छी तर्कशक्ति है, क्योंकि...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) मित्रों, यही है जीवन की सच्चाई।हम अक्सर बड़ी चीजों में...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (TMKOC) में सहायक भूमिका निभाने वाले अभिनेता ललित मनचंदा (Lalit Manchanda) की आत्महत्या की खबर ने मनोरंजन उद्योग और...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 36 वर्षीय ललित मनचंदा का निधन 21 अप्रैल 2025 को...

एसोसिएशन ऑफ सिने एंड टीवी/ एड प्रोडक्शन एग्जीक्यूटिव्स का स्वर्ण जयंती समारोह 1 मई को….!

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) आयोजन का अवलोकनएसोसिएशन ऑफ सिने एंड टीवी/एड प्रोडक्शन एग्जीक्यूटिव्स (ACTAPE)...

बहुत सुंदर और भावुक मोटिवेशनल स्पीच का अंश है, जिसे RLG Production के माध्यम से प्रसारित किया गया है। इसमें प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता और...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) यह इसका पूरा विवरण प्रस्तुत है:विवरण:स्पीच का शीर्षक:"अब शिकायत किससे...