माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावला* …….उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

Date:

Share post:

Madhukar Pichad

*P.V.Anandpadmanabhan*

*मुंबई* , राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.मधुकर पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी जवळपास 35 वर्ष प्रतिनीधीत्व केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. आदिवासी बांधवांचे प्रश्न त्यांनी विधानसभेत नेहमीच मांडले. आदिवासी बहुल अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील ते नेहमी प्रयत्नशील राहिले.मी मुख्यमंत्री असताना काही महिन्यांपूर्वी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत आदिवासी भागातल्या आमदारांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. आपल्या प्रकृतीची चिंता न करता मधुकरराव या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यातून त्यांची आदिवासी बांधवाविषयीची तळमळ दिसून येते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Related articles

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बैठक में 15 परियोजनाओं की समीक्षा की ,परियोजनाओं को निर्धारित समयसीमा में पूरा करने को प्राथमिकता दें• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पी.वी.आनंदपद्मनाभनमुंबई,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज वॉर रूम बैठक में पिछली बैठकों में समीक्षा किए गए 18 परियोजनाओं और...

IGL Row: SC ने कहा- रणवीर अल्लाहबादिया के खिलाफ जांच पूरी, बढ़ाई गई गिरफ्तारी से दी गई अंतरिम सुरक्षा

Ranveer Allahbadia: सोमवार को सुप्रीम कोर्ट में जस्टिस सूर्या कांत और जस्टिस एन. कोटिश्वर सिंह की बेंच ने...

कर्नाटक के पूर्व पुलिस महानिदेशक (डीजीपी) ओम प्रकाश की हत्या का मामला 20 अप्रैल 2025 को बेंगलुरु के एचएसआर लेआउट स्थित उनके आवास पर...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) नीचे इस मामले का विस्तृत विवरण दिया गया है:घटना का...

Share Market: हफ्ते के पहले कारोबारी दिन झूमा शेयर बाजार; सेंसेक्स 800 अंक उबरा, निफ्टी 24100 के पार

इससे पहले बीते हफ्ते के आखिरी कारोबारी दिन यानी गुरुवार को बीएसई बेंचमार्क सेंसेक्स 1,508.91 अंक या 1.96...