Close Menu
    What's Hot

    Stock Market Rally: बाजार में अच्‍छी तेजी… सेंसेक्‍स 550 अंक चढ़ा, 20% तक उछले ये शेयर!

    June 16, 2026

    पत्नी पर शक करता था पति, दिनदहाड़े उठाया ये खौफनाक कदम

    June 16, 2026

    एक्ट्रेस संचिता उगले को था आउटसाइडर होने का मलाल, स्ट्रगल पर छलका था दर्द

    June 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Home»Mumbai Maharashtra»कोपरीतील मलनिस्सारणप्रकल्प ठरला पांढरा हत्ती!
    Mumbai Maharashtra

    कोपरीतील मलनिस्सारणप्रकल्प ठरला पांढरा हत्ती!

    जनकल्याण टाइमBy जनकल्याण टाइमApril 25, 2026Updated:April 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram Copy Link
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link
    • उत्पन्न शून्य, खर्च मात्र वर्षाला १० कोटी
    • ठामपाच्या दुर्लक्ष आणि कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या पैशांची लुट – आमदार संजय केळकर
    • पी.वी.आनंदपद्मनाभन
      ठाणे:
      सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे. या प्रकल्पातून ठाणे महापालिकेला एक रुपयाही उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला दहा कोटी रुपये द्यावे लागत आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

    ठाणे पूर्वेत कन्हैय्या नगरलगत ठाणे महापालिकेने पीपीपी तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारला असून २०२१ साली संबंधित कंत्राटदार ए.के. इलेक्ट्रिकल्स या कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केले. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणे अपेक्षित असताना त्यासाठी २०२५ साल उजाडले. विशेष म्हणजे या प्रकल्पाची सांडपाण्यातून १२० एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना फक्त पाच एमएलडी शुद्ध पाणी तयार करण्यात आले आहे. सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आणि तयार होणारे शुद्ध पाणी विकून महापालिकेला उत्पन्न मिळावे, असा उद्देश हा प्रकल्प उभारण्यामागे होता. मात्र आजतागायत अपेक्षित पाणी निर्मिती झाली नाहीच, शिवाय पाणी विक्रीही झाली नाही. उलट महापालिकेलाच दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक दहा कोटी रुपये द्यावे लागत आहेत. ही ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.

    या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओंकार चव्हाण आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.

    याबाबत बोलताना केळकर म्हणाले, या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि अनियमितता असून महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने ९० कोटींचा दंडही ठोठावला आहे तर घेतलेल्या कर्जावर नऊ कोटी एवढे व्याज भरण्यासाठी कंत्राटदार कंपनी टाळाटाळ करत असून कंत्राटदार आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. १२० एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पातून फक्त पाच एमएलडी पाणी शुद्ध होत असल्याने कंत्राटदारांच्या क्षमतेवरच संशय निर्माण होत आहे. शिवाय प्रक्रियेतून निर्माण होणारा गाळ जवळच्या नाल्यात आणि कांदळवनात टाकला जात आहे. परिणामी ठाणेकरवाडी आदी परीसरात पावसाळ्यात पाणी शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान होत असते तर कांदळवनही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली.

    या प्रकल्पातून तयार होणारे शुद्ध पाणी बांधकामे, उद्याने, एमआयडीसी, कारखाने आदींना पुरवून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे अपेक्षित आहे, मात्र या उद्देशाला हरताळ फासण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संशयास्पद कंत्राटदार कंपनीला एक दोन नव्हे तर आठ प्रकल्पांची कामे देण्यात आली आहेत.

    त्यामुळे या भ्रष्टाचारात अनेक हात गुंतले असल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी आम्ही चौकीदार असून यापुढेही चौकीदाराची भूमिका बजावत राहू, असे स्पष्ट केले

    Follow on Google News Follow on Flipboard
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleचैट, ब्लैकमेलिंग और 63 लाख की उगाही… क्राइम ब्रांच ने किया महिला क्रिकेटर के ‘सेक्स्टॉर्शन जाल’ का खुलासा
    Next Article 👉 “ॐ साईं राम – प्रभु का स्मरण करते हुए आपका दिन शुभ और मंगलमय हो।”अब इसी भाव को विस्तार देते हुए, आपके कहने अनुसार एक प्रेरणादायक संदेश प्रस्तुत है —🌅 जनकल्याण टाइम्स, मुंबई के माध्यम से🎬 बॉलीवुड लेखक-निर्देशक राजेश भट्ट साहब की कलम से📸 प्रस्तुति: धनंजय राजेश गावड़े (प्रेस फोटोग्राफर)
    जनकल्याण टाइम

    Related Posts

    कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध योजनांचा आढावा

    June 13, 2026

    CBI की कार्रवाई तेज

    May 23, 2026

    Fortis Hospital Kalyan Launches Advanced Emergency Services

    May 23, 2026

    🚨 BREAKING NEWS 🚨छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र में अतिक्रमण कार्रवाई के बाद महिलाओं का दर्दनाक हाल! Exclusive Report – Deputy Editor P.V Anand | मुंबई

    May 8, 2026

    🚨 BREAKING NEWS | जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई📍 दिल्ली से बड़ी खबर दिल्ली में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां जज अमन कुमार शर्मा ने कथित तौर पर फांसी लगाकर आत्महत्या कर ली। इस घटना के बाद न्याय व्यवस्था और प्रशासन पर कई बड़े सवाल खड़े हो गए हैं।

    May 5, 2026

    KDMC लाच सापळा कार्यवाही

    May 1, 2026
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Economy News

    Stock Market Rally: बाजार में अच्‍छी तेजी… सेंसेक्‍स 550 अंक चढ़ा, 20% तक उछले ये शेयर!

    By जनकल्याण टाइमJune 16, 2026

    शेयर बाजार में लगातार दूसरे दिन शानदार तेजी देखने को मिली. निफ्टी 136 अंक चढ़कर…

    पत्नी पर शक करता था पति, दिनदहाड़े उठाया ये खौफनाक कदम

    June 16, 2026

    एक्ट्रेस संचिता उगले को था आउटसाइडर होने का मलाल, स्ट्रगल पर छलका था दर्द

    June 16, 2026
    Top Trending

    Stock Market Rally: बाजार में अच्‍छी तेजी… सेंसेक्‍स 550 अंक चढ़ा, 20% तक उछले ये शेयर!

    By जनकल्याण टाइमJune 16, 2026

    शेयर बाजार में लगातार दूसरे दिन शानदार तेजी देखने को मिली. निफ्टी…

    पत्नी पर शक करता था पति, दिनदहाड़े उठाया ये खौफनाक कदम

    By जनकल्याण टाइमJune 16, 2026

    गुरुग्राम के फर्रुखनगर में एक ईंट सप्लायर ने कथित तौर पर अपनी…

    एक्ट्रेस संचिता उगले को था आउटसाइडर होने का मलाल, स्ट्रगल पर छलका था दर्द

    By जनकल्याण टाइमJune 16, 2026

    कुमकुम भाग्य’ फेम टेलीविजन एक्ट्रेस संचिता उगले ने 14 जून को मुंबई…

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Advertisement
    Demo
    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.