हिस्टोरिकल कॉइन्स , आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धा.

पी.वी.आनंदपद्मनाभन

Dombivli

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी 2014 पासून डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान आणि इतिहास विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

विद्यार्थ्यां मधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन 29 व 30 जानेवारी 2026 रोजी बेलग्रेव स्टेडियम, रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत पार पडले. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते. तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर्षी हिस्टोरिकल कॉइन्स आणि हिस्टोरिकल स्टॅम्प पेपर चे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, पदक, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले असून या वर्षी 45 शाळा सहभागी झाल्या होत्या तर 80 प्रोजेक्ट मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक, अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले. 5 ते 7 आणि 8 ते 10 अशा 2 गटामध्ये स्पर्धा झाली आणि 1.50 लाखाची बक्षीस विजेत्यांना मिळवली.

विज्ञान प्रदर्शनासाठी एआय आधारित स्मार्ट सुरक्षा, सोलार ट्रेकिंग सिस्टम, स्मार्ट कचरा वर्गीकरण, हायड्रोजन फ्युएल सेल, स्वयंचलित रोप पाणीपुरवठा, प्लास्टिक ते इंधन संकल्पना, पायजोइलेक्ट्रिक फूड स्टेप पावर जनरेटर आणि पोस्टर्स स्पर्धेसाठी हवामान बदल, एआय व रोबोटिक्स, चंद्रयान 3 मोहीम, पाणी वाचवा जीवन जगवा, प्लास्टिक प्रदूषण जनजागृती, मानवी मेंदू, हेल्दी फूड विरुद्ध जंक फूड, विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा, सौरमंडळ असे विविध विषय देण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *