
कल्याण :
KDMC निवडणूक 2026 ची मतदान तारीख जवळ येत असताना, कल्याण पूर्व परिसरात प्रचाराची धग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उमेदवार घरोघरी, गल्लोगल्ली प्रचार करत असून संपूर्ण मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पॅनल क्रमांक 12 हा सध्या अत्यंत चुरशीचा आणि ‘नेक-टू-नेक’ लढतीचा भाग ठरत असून, सर्वच पक्षांचे उमेदवार येथे पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. याच पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रथमच निवडणूक लढवणारे विक्रांत शिंदे हे उमेदवार सध्या मोठ्या लाटेवर असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
विक्रांत शिंदे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की,
“कल्याण पूर्व भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर विकासाची गरज आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, शालेय शिक्षण व्यवस्था, नागरी सोयी-सुविधा यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारा विकास अपेक्षित आहे.”
ते पुढे म्हणाले की,
“माझे आजोबा आणि वडील हे अनेक वर्षांपासून याच शहरात वास्तव्यास असून त्यांनी नागरिकांसाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे लोकांचा विश्वास निर्माण झाला असून, तोच वारसा पुढे नेण्याची संधी मला मिळत आहे.”
याच दरम्यान परिसरातील ज्येष्ठ आणि प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्याशीही चर्चा करण्यात आली. नागरिकांशी असलेल्या मजबूत नात्यामुळे आणि समाजासाठी केलेल्या विविध कार्यांमुळे ते परिसरात परिचित आहेत. त्यांनी सांगितले की,
“माझा मुलगा समाजासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी त्याच निष्ठेने काम करावा, हीच माझी इच्छा आहे.”

ते पुढे म्हणाले की,
“नागरिकांचा भरघोस आशीर्वाद मिळाल्यास हा विजय समाजसेवेच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरेल. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून समाजसेवेची शपथ आहे.”
सध्या कल्याण पूर्व मतदारसंघात वडील-पुत्रांच्या सामाजिक कार्याचा वारसा आणि नव्या नेतृत्वाची ऊर्जा यांचा संगम पाहायला मिळत असून, येणाऱ्या KDMC निवडणुकीत हा घटक निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
❤️ “KDMC 2026 मध्ये कल्याण पूर्वेत परिवर्तनाची लाट, पॅनल 12 वर विक्रांत शिंदेंना वाढता जनसमर्थन.”