मराठा सैन्य लँडस्केप्सला युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव

Date:

Share post:

पी.वी.आनंद

New Delhi,

भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या “मराठा सैन्य लँडस्केप्स” ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक यशामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सर्व नागरिकांना या किल्ल्यांना भेट देण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हटले, “मराठा साम्राज्याचा उल्लेख होताच सुशासन, सैन्यशक्ती, सांस्कृतिक गौरव आणि सामाजिक कल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर येतो. या महान शासकांनी अन्यायाविरुद्ध न झुकण्याची प्रेरणा आपल्याला दिली आहे.” त्यांनी २०१४ मध्ये रायगड किल्ल्याला दिलेल्या भेटीची आठवण सांगताना म्हटले, “रायगडावरील ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाली.” त्यांनी सर्व नागरिकांना या किल्ल्यांना भेट देऊन मराठा इतिहासाची माहिती घेण्याचे आवाहन केले.

या यादीत मराठा साम्राज्याच्या १२ भव्य किल्ल्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ले—रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील एक किल्ला—जिंजी यांचा समावेश आहे. या किल्ल्यांना “मराठा सैन्य लँडस्केप्स” या संकल्पनेअंतर्गत “अद्वितीय वैश्विक मूल्य” (Outstanding Universal Value) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मराठा स्थापत्यशास्त्रातील माची स्थापत्य, जे गडाच्या सुरक्षिततेसाठी आणि युद्धकौशल्यासाठी अद्वितीय आहे, याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हे स्थापत्य जगातील इतर कोणत्याही किल्ल्यांमध्ये आढळत नाही.
या यशामागे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे एकत्रित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याने आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) तसेच संस्कृती मंत्रालयाच्या सहभागाने हा टप्पा गाठता आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशासाठी पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी यांचे आभार मानले. शेलार यांनी युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केले, ज्यामुळे या यशाला गती मिळाली.

मराठा किल्ल्यांचे माची स्थापत्य हे त्यांच्या रणनीतिक आणि अभेद्य डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे बांधकाम हे मराठा साम्राज्याच्या युद्धकौशल्याचा आणि मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. या किल्ल्यांनी स्वराज्याच्या निर्मिती आणि संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली. युनेस्कोच्या मान्यतेमुळे या स्थापत्यशास्त्राला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.

या युनेस्को मान्यतेमुळे मराठा इतिहासाला जागतिक व्यासपीठावर नवा गौरव प्राप्त झाला आहे. यामुळे पर्यटन, इतिहास संशोधन आणि सांस्कृतिक जतनाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.

Related articles

📰 RLG PRODUCTION की नई पेशकश – EK NAYAK DO HASINA 📰फिल्म जगत में कहानियाँ तो बहुत आईं, लेकिन अब आ रही है एक...

Krishnakant Eknath payaji (Press photographer Goa) ✨ "EK NAYAK DO HASINA" ✨एक ऐसा सिनेमा जो ड्रामा, इमोशन और रिश्तों...

📰 जन कल्याण टाइम न्यूज़ – गोवा की जनता के लिए खास रिपोर्ट प्रेस फोटोग्राफर – कृष्णकांत एकनाथ पायाजी, गोवा🚨 मापुसा नगर निगम की...

Krishnakant Eknath payaji (Press photographer Goa) गोवा की पहचान हमेशा से स्वच्छता, प्राकृतिक सुंदरता और पर्यटन के लिए रही...

📰 ब्रेकिंग स्टोरी | करदाताओं के साथ नाइंसाफी!👉 “दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था में सड़कों की ये हालत?”

Krishnakant Eknath payaji (Press photographer Goa) दोस्तों, आज हम आपके सामने एक ऐसी तस्वीर लेकर आए हैं जो हमारे...

इस चित्र में एक बहुत ही गहन और प्रेरणादायक संदेश छिपा है। इसमें लिखा गया है –”Degree is just a piece of paper, Your...

विस्तृत विवेचन (हिंदी में): डिग्री का महत्व सीमित है –आज के समय में हर कोई डिग्री प्राप्त करने की...