Close Menu
    What's Hot

    लालच, क्रोध और बेईमानी से परे एक सिख – इंसानियत का उजाला✍️ Story by: राजेश लक्ष्मण गवड़े Editor-in-Chief, जन कल्याण टाइम न्यूज़

    January 25, 2026

    🌼 आस्था, कर्म और इंसानियत — यही जीवन का सच्चा रास्ता है एक प्रेरणादायक संदेश बॉलीवुड लेखक एवं निर्देशक राजेश भट्ट (मुंबई) की कलम से

    January 25, 2026

    वो ज्यादा फीस चार्ज करते हैं…’, एआर रहमान के बयान पर बोले रणवीर शौरी, बॉलीवुड में भेदभाव पर भी दिया रिएक्शन

    January 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Home»Mumbai Maharashtra»मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) लोकार्पण संपन्न
    Mumbai Maharashtra

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) लोकार्पण संपन्न

    जनकल्याण टाइमBy जनकल्याण टाइमMarch 18, 2025Updated:March 18, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram Copy Link
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

    P.V.Anandpadmanabhan

     ठाणे,
    • देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवक्षेत्र मराडे पाडा, ता.भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) लोकार्पण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
      यावेळी स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, प.पू. बालयोगी सदानंद बाबा, ह.भ.प डॉ.कैलास महाराज निचिते, राष्ट्रसंत नीलकंठ शिवाचार्य, प.पू. आलोकनाथ महाराज, खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार दौलत दरोडा, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश चौघुले, शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी, श्री.विश्वनाथ पाटील, नरेंद्र पवार, जितेंद्र डाकी, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामी, श्री.अनंता भोईर, आदी मान्यवर उपस्थित होते.
      सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत त्यांनी कैलास निचिते व राजू चौधरी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराच्या संकल्पना व प्रत्यक्ष निर्माणाकरिता कौतुक केले. ते म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आपल्या इष्ट देवतेचे मंदिरात जावून दर्शन घेवू शकतो. देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, त्यांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. अतिशय सुंदर, भव्य दिव्य असे हे मंदिर निर्माण करण्यात आले आहे. या मंदिराला सुंदर तटबंदी आहे, अतिशय चांगले बुरुज आहे, दर्शनीय अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग, बगीचा आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक आणि पुढे संभाजी महाराजांची वाटचाल असे अतिशय सुरेख प्रसंग उभे करण्यात आले आहेत. यातून प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. जसे हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचे दर्शन पूर्ण होत नाही तसेच छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन पूर्णत्वास येत नाही.
      आई जिजाऊंच्या संस्कारांनी अन् आशिर्वादाने शिवबा घडले. त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीतूनच शिवरायांनी मुघलांच्या आव्हानांचा प्रतिकार करायला सुरुवात केली. प्रभू श्रीराम हे युगपुरुष होते. त्यांनी समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती निर्माण केली. त्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आहे. रावणाविरुद्ध लढताना जसे श्रीरामांनी सर्वसामान्यांना एकत्र केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बलाढ्य फौजेविरुद्ध सर्वसामान्य जनतेतून शक्ती निर्माण केली आणि भगवा झेंडा फडकविला. जातीपातीत विभागलेला महाराष्ट्र महाराजांना अपेक्षित नाही. देव, देश आणि धर्मापायी सर्वस्व पणाला लावणारा, देशाचा गौरव वाढविण्याचा संकल्प करणारा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 300 वी जन्मशताब्दी साजरी होत असताना देश घडविण्याच्या कार्यात आपले योगदान देवू या, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले.
      ते पुढे म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा म्हणून नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वर येथे देखील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पानिपत येथील लढाई सर्वांना माहितच आहे. महादजी शिंदे यांनी गाजविलेला पराक्रम सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणीही भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
      आज लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शक्तीपिठाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात येईल. त्याचप्रमाणे भिवंडी-वाडा या रस्याााचे कामही प्रगतीपथावर आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या शक्तीपिठाकडील येणाऱ्या सर्व मार्गांचे नियोजन उत्तमरित्या करावे, येथे येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आवश्यक सोयीसुविधा तयार कराव्यात. शासन यासाठी तत्पर असून याकरिता निधीची कमतरता पडणार नाही.
      कार्यक्रमाच्या सुरुवातीस आयोजन समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि लोकार्पण झालेल्या मंदिराची प्रतिकृती देवून सत्कार केला.

    https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==

    Follow on Google News Follow on Flipboard
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleडोंबिवलीत छत्रपती शिवाजी महारांजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
    Next Article विधान परिषद की 5 सीटों पर निर्विरोध उपचुनाव
    जनकल्याण टाइम

    Related Posts

    KDMC Elections in Panel 12 on high modes with commitment for citizens welfare.Our Deputy editor P.V.Anand.Iyer interacts with Candidate Leena Karpe.

    January 11, 2026

    KDMC निवडणूक 2026 : कल्याण पूर्वेत प्रचंड राजकीय लाट, वडील-पुत्रांची भूमिका चर्चेत. पी.व्ही. आनंदपद्मनाभन डेप्युटी एडिटर – जनकल्याण टाइम न्यूज, मुंबई-कल्याण

    January 11, 2026

    “जहाँ समंदर ख़ामोश था… और दोस्ती बोल रही थी”शंघाई (चीन) से जुहू, मुंबई तक — दूरी नहीं, भरोसे की कहानी 🎥 Rajesh Bhatt Bollywood Writer & Director

    January 10, 2026

    KDMC Elections 2026,Mighty Waves at Kalyan East.Father,Son speaks on it

    January 9, 2026

    जन कल्याण टाइम न्यूज़ – ब्रेकिंग न्यूज़ अपडेट इंडिगो-DGCA संकट: भारत की एविएशन इंडस्ट्री में भूचाल – हजारों फ्लाइट्स कैंसल, यात्रियों का बुरा हाल | अडानी कनेक्शन की अफवाहें तेज, क्या है सच्चाई?

    December 7, 2025

    क्‍या हुआ, IndiGo पर कैसे असर पड़ा, नए DGCA नियम क्या हैं, और आगे क्या चल रहा है — हिन्दी में:🔎 क्या हुआ — फ्लाइट्स रद्द और क्रू की कमी

    December 5, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Economy News

    लालच, क्रोध और बेईमानी से परे एक सिख – इंसानियत का उजाला✍️ Story by: राजेश लक्ष्मण गवड़े Editor-in-Chief, जन कल्याण टाइम न्यूज़

    By जनकल्याण टाइमJanuary 25, 2026

    यह कहानी है एक ऐसे सिख की, जो न किसी गद्दी पर बैठा था, न…

    🌼 आस्था, कर्म और इंसानियत — यही जीवन का सच्चा रास्ता है एक प्रेरणादायक संदेश बॉलीवुड लेखक एवं निर्देशक राजेश भट्ट (मुंबई) की कलम से

    January 25, 2026

    वो ज्यादा फीस चार्ज करते हैं…’, एआर रहमान के बयान पर बोले रणवीर शौरी, बॉलीवुड में भेदभाव पर भी दिया रिएक्शन

    January 25, 2026
    Top Trending

    लालच, क्रोध और बेईमानी से परे एक सिख – इंसानियत का उजाला✍️ Story by: राजेश लक्ष्मण गवड़े Editor-in-Chief, जन कल्याण टाइम न्यूज़

    By जनकल्याण टाइमJanuary 25, 2026

    यह कहानी है एक ऐसे सिख की, जो न किसी गद्दी पर…

    🌼 आस्था, कर्म और इंसानियत — यही जीवन का सच्चा रास्ता है एक प्रेरणादायक संदेश बॉलीवुड लेखक एवं निर्देशक राजेश भट्ट (मुंबई) की कलम से

    By जनकल्याण टाइमJanuary 25, 2026

    मुंबई से जन-जन तक पहुँचे यह संदेशजन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई के…

    वो ज्यादा फीस चार्ज करते हैं…’, एआर रहमान के बयान पर बोले रणवीर शौरी, बॉलीवुड में भेदभाव पर भी दिया रिएक्शन

    By जनकल्याण टाइमJanuary 25, 2026

    एआर रहमान के बॉलीवुड को दिए गए बयान की देशभर में खूब…

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Advertisement
    Demo
    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.