अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, डॉ. अनुजा पुरंदरे आणि ओनिल कुलकर्णी यांनी चित्रनगरीच्या महिला अधिकारी-कर्मचारी यांच्या सोबत साधला संवाद

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन

*मुंबई,
फिल्मसिटी अर्थात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व बी द चेंज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी चित्रनगरीत महिला दिनानिमित्ताने (Women’s Day) विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड, डॉ. अनुजा पुरंदरे आणि श्री. ओनिल कुलकर्णी यांनी विविध विषयांवर चित्रनगरीतील महिलांसोबत संवाद साधला.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी महिलांना शुभेच्छा दिल्या. चित्रनगरीच्या विकासामध्ये महिलांचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासकीय स्तरावर चित्रनगरीच्या महिला अधिकाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्ताधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, बी.द.चेंजच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी आर्या मोरे आणि महामंडळातील महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होत्या.

दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी ‘स्त्रियांपुढील आव्हाने’ या विषयावर संवाद साधला. “आपली पुरुषप्रधान संस्कृती असली तरी आजची स्त्री सशक्त आहे. जगाच्या पाठीवर आज भारतीय स्त्री म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी. आपल्यातल्या चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या कशा होतील आणि उणीवांची वजाबाकी न करता त्यावर सुधारणा केल्या तर यशाचं सहजतेनं स्वागत करता येईल”, असं निशिगंधा वाड म्हणाल्या.

डॉ. अनुजा पुरंदरे यांनी ‘महिलांचेआरोग्य’ या विषयावर भाष्य करताना मासिक पाळी, गर्भधारणा, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या अनेक समस्यांवर भाष्य केलं. चांगला आहार घेणं, व्यायाम करणं, वैद्यकीय सल्ला घेणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी अधोरेखित केलं. त्याचबरोबर ओनिल कुलकर्णी यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित स्त्रीयांना ‘POSH ACT’बद्दल माहिती दिली.

https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==

Related articles

“15 अगस्त स्वतंत्रता दिवस एवं परम पूज्य श्री सूयशजी महाराज के जन्मदिवस की धूमधाम से हुई भव्य समारोह पूर्वक उत्सव”

मानव उत्थान सेवा समिति, नवसारी शाखा के श्री हंस कीर्तिधाम आश्रम में दिनांक 15/08/2025 को परम पूज्य श्री...

किश्तवाड़ आपदा पर जापानी पीएम ने गहरा दुख जताया; कैरेबियाई क्षेत्र में चक्रवात ‘एरिन’ से खतरा बढ़ा

जापान के प्रधानमंत्री शिगेरू इशिबा ने जम्मू-कश्मीर के किश्तवाड़ में बादल फटने के बाद मची तबाही को लेकर...

🌸🙏 सुजलाम सुफलाम सुप्रभात 🙏🌸

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) मेरे प्यारे दर्शकों, 👉 सुख मनुष्य के अहंकार की परीक्षा लेता...

बॉलीवुड लीजेंड फिल्म फेस्टिवल संपन्न

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) अंधेरी (पश्चिम), मुंबई स्थित इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर एशोसिएशन (इंपा)...