विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का; करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान

Date:

Share post:

P.V.Anandpadmanabhan

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे 30 वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक 66.05 टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान टक्केवारीस राज्यातील मतदार हा नक्कीच अभिनंदनास पात्र ठरला आहे. यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वांधिक दिसून येतो. महाराष्ट्र राज्याच्या 288 मतदारसंघाकरिता राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यात 5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार तर 6 हजार 101 इतर मतदार म्हणून नोंदीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदार आहेत. यात प्रत्यक्ष मतदानात 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला. 288 मतदारसंघाचा मतदानाचा ताळेबंद पाहता, यावर्षी सर्वांधित मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे 84.96 टक्के मतदान झाले तर सर्वांधिक कमी मतदान हे कुलाबा या मतदारसंघात झाले. कुलाबा या मतदारसंघात 44.44 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

Related articles

🎬 प्रेरणादायक विचार – राजेश भट्ट साब जी (The Great Director of Bollywood) की कलम से 🎬प्रस्तुत – Jan Kalyan Time News, Mumbai व...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 🌟 "कर्ज चुकाया जा सकता है… पर एहसान चुकाने का...

💐🎉 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई की खास रिपोर्ट 🎉💐दिनांक: 10 जुलाई 2025🖊️ Editor in Chief: राजेश लक्ष्मण गावडे

B Ashish ( jan Kalyan time News mumbai) Bollywood press photographer 🎂💖 बॉलीवुड की ख़ूबसूरत अदाकारा संगीता बिजलानी जी को...

🌞✨ 10 जुलाई 2025 ✨🌞📺 RLG Production व Jan Kalyan Time News Mumbai की ओर से🎤 प्रस्तुति: राजेश लक्ष्मण गावडे द्वारा एक अनमोल प्रेरणादायक...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 🌟 👏👏 जीवन के अनमोल खजाने 👏👏 🌟 💠 रिश्ते कोई...

‘महावतार नरसिम्हा’ 25 जुलाई को रिलीज़ होगी

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) ...