

*पी.वी.आनंदपद्मनाभन*
142 कल्याण पूर्व मतदार संघात पोलीस अधिकारी वर्गासमवेत झालेल्या गैरसमजुतीमधून किन्नर पंथीय समुदायाने आज विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला होता, तथापि निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी ,महापालिका अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती सदर प्रकार गैरसमजुतीमुळे घडला असल्याची प्रांजल कबुली किन्नर समुदायाच्या जिल्हा आयकॉन नीता केणे यांनी आज दिली . नीता केणे यांचे समवेत अनेक किन्नरपंथीय मतदारांनी आपली बहिष्काराची भूमिका मागे घेत मतदान केले. पोलीस अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असून किन्नरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे आणि आज सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आम्हाला मुख्य प्रवाहात आणले जाईल असा आशावाद नीता केणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
किन्नर पंथीय मतदारांची गैर समजूत दूर करून त्यांस मतदानास प्रवृत्त करण्यासाठी यांच्या मार्गदर्शनाखाली 142-विधानसभा मतदान संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त ठाणे संजय जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ , परिमंडळ- 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी संजय जाधव,तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मोलाची भूमिका बजावली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे अशोक शिनगारे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड हे देखील सदर प्रकरणी वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते.